
सगळेच देव मंदिरात नसतात.
काही धावतात.
NOT ALL GODS LIVE IN TEMPLES. SOME RUN.
· RACE BEGINS
· 05 MAYFINISH LINE
· 15 JUNE
बैलगाडा शर्यतीवर चित्रपट यावा
असं कोणाला वाटत नाही?
वाटतंच.
गावात, शर्यतीत, यूट्यूबच्या कमेंटमध्ये…
सगळीकडे एकच चर्चा.
म्हणूनच “आपण” ठरवलं
बनवायचा एक अविस्मरणीय अनुभव…
मोठ्या गप्पा नाही, मोठे दावे नाहीत.
फक्त एक प्रामाणिक प्रयत्न —
आपल्या मातीचा, आपल्या बैलगाड्याचा.
हा फक्त चित्रपट नाही.
हा महाराष्ट्राच्या मातीचा, परंपरेचा
आणि बैलगाड्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांचा
सन्मान आहे.

क्राउडफंडिंग | Crowdfunding
मराठी सिनेसृष्टीत प्रथमच... मायबाप प्रेक्षकांचा, प्रेक्षकांकडून आणि प्रेक्षकांसाठीच घडणारा चित्रपट!
For the first time in Marathi cinema — a film of the people, by the people, for the people.
हो.. तुम्ही सुद्धा बनू शकता चित्रपट निर्माते.
Yes — you too can become a film producer.
अधिक माहिती जाणून घ्या→ट्रेलर | Trailer
पहिली झलक
FIRST LOOK
चित्रपटाबद्दल | About the Film
बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची ४५०-वर्षांची जिवंत परंपरा आहे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या रक्तातच मुरलेली. शर्यतीचा दिवस म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तो एक उत्सव आहे. गावं जागतात. माणसं लांबून येतात. खिल्लारी बैलजोडी, गाडी, सारथी आणि धुळीचे लोट, हे सारं महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक आहे, शेकडो वर्षांपासून. आज यूट्यूबवर बैलगाडा शर्यतीच्या चॅनेलला लाखो सबस्क्रायबर्स आहेत, इन्स्टाग्रामवर करोडो व्ह्यूज आहेत, याचा अर्थ एकच: हे प्रेम खोल आहे, हे प्रेम सच्चं आहे.
मग इतक्या मोठ्या परंपरेला मोठ्या पडद्यावर न्याय का मिळाला नाही? आतापर्यंत या विषयावर केवळ एक, दोन मुख्य चित्रपट आले, आणि डझनभर लघुपट किंवा माहितीपट. पण एकाही चित्रपटाने या परंपरेचा खरा थरार, खरी भावना आणि खरा आत्मा मोठ्या पडद्यावर आणला नाही. बैलगाडा शर्यत म्हणजे फक्त धूळ उडवणाऱ्या गाड्या नाहीत, ती एक महाकाव्याची भूमी आहे. तिला हवे ते भव्य दृश्य, चित्तथरारक VFX, आणि हॉलिवूडसारखा आत्मविश्वास, जे आजपर्यंत कोणी आणलं नाही.
राहुल पोखरकर यांनी हीच उणीव जाणली. ज्या माणसाने Dune, Ready Player One, Top Gun: Maverick सारख्या हॉलिवूड चित्रपटांवर VFX काम केलं, त्याला माहीत आहे की बैलगाडा शर्यतीच्या धुळीत, त्या खिल्लारी बैलांच्या डोळ्यांत, आणि त्या गाडीच्या चाकाच्या आवाजात, एक जागतिक दर्जाची कहाणी दडलेली आहे. आता तंत्रज्ञान आलंय. आता माणूस आलाय. आता वेळ आलीय, आपली शर्यत, आपल्याच भव्यतेत, मोठ्या पडद्यावर मांडण्याची.
भाषा | Languages
Marathi, Hindi, English
शैली | Genre
Drama / Sport
दिग्दर्शक | Director
Rahul Pokharkar
The Bailgada Sharyat is a 450-year-old living tradition of the farmers of Konkan, western Maharashtra and Marathwada. Race day is not just a competition, it is a festival. Villages wake before dawn. Families travel hundreds of kilometres. The thunder of hooves, the roar of the crowd, the Khillari bulls, the cart, the charioteer, and the golden dust, together they represent the pride of Maharashtra, carried forward across centuries. Today, dedicated YouTube channels command hundreds of thousands of subscribers. Race videos rack up crores of views. Entire communities organise their calendars around it. The love is real. The audience is enormous. And it has been waiting, patiently, for someone to tell its story properly.
So why, in all these decades, has Bollywood or Marathi cinema never given it the screen it deserves? Only one or two significant films have attempted this subject, and beyond those, barely a handful of short films and documentaries. None of them captured the true thunder, the true emotion, or the true grandeur of what this tradition really is. The Bailgada Sharyat is not a background detail. It is an epic. It demands breathtaking cinematography, large-scale production, and Hollywood-grade VFX, the kind that makes a bull's hooves feel like they shake the earth beneath your seat.
That gap is exactly what drove Rahul Pokharkar to write NANDI. A man who spent years on the VFX teams of Dune, Ready Player One and Top Gun: Maverick, who understands at a cellular level what cinematic scale truly means, looked at the Bailgada Sharyat and saw what the world had been missing. The technology now exists. The craft now exists. The passion has always existed. For the first time, all three are in the same room, and the result is a Marathi film built to the standard this tradition has always deserved, but never received.

