Nandi
NANDI Crowdfunding

Crowdfunding

शर्यत सुरू
RACE BEGINS
05 MAY
FINISH LINE
15 JUNE

आपला 'नंदी': काळजातून उमटलेली एक हाक

मायबाप प्रेक्षकांनो,

नंदी कुठल्या मोठ्या स्टुडिओचा किंवा बड्या बॅनरचा चित्रपट नाही; तो तुमच्या विश्वासाचा आणि आपल्या संस्कृतीचा आरसा आहे. जेव्हा घामाच्या धारा वाहतात, धुळीचे लोट उसळतात आणि हजारो कंठातून एकच जल्लोष बाहेर पडतो, तेव्हा तिथे तिकीट नसतं, केवळ एक ओढ असते — आपल्या माणसांची आणि आपल्या मातीची. नंदी याच ओढीतून, याच मातीतून जन्माला आला आहे.

आजपर्यंत 'निर्माता' हा शब्द फक्त एसी केबिन आणि मोठ्या बजेटपुरता मर्यादित होता. पण आज, आम्ही तो सन्मान तुमच्या हाती सोपवत आहोत. तुम्ही दिलेली छोटीशी भेटसुद्धा या चित्रपटाचा श्वास आहे.

बैल जेव्हा पळतो, तेव्हा ती फक्त शर्यत नसते — तो एक थरार असतो जो श्रीमंत-गरीब असा भेद मानत नाही. नंदी तोच थरार, तीच अस्मिता पडद्यावर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही या प्रवासात सोबत आलात, तर तुमचं नाव केवळ पडद्यावरच्या 'क्रेडिट्स'मध्ये नसेल, तर ते या चळवळीच्या इतिहासात कोरलं जाईल.

मराठी सिनेमाला आज मोठ्या घरांची नाही, तर तुमच्यासारख्या मोठ्या मनांची गरज आहे. हा चित्रपट तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे आणि आता तो तुमच्याकडूनच घडायचा आहे.

या, नंदीचा सांगाती व्हा...

निर्माते व्हा!

सहभागाचे स्वरूप : हे कसे कार्य करते?

How It Works: Participation Categories

१. बैलगाडा शर्यत प्रेमी

Fan of Bailgada Sharyat — Fan Category

गुंतवणूक

₹५०० ते ₹५०,००० पर्यंत

Contribution: ₹500 to ₹50,000

हा गट अशा लोकांसाठी आहे ज्यांना या संस्कृतीवर प्रेम आहे आणि ज्यांना या सिनेमाचा भाग व्हायचे आहे.

This category is for those who love the sport and want to see our culture on the big screen.

  • नफा भागीदारी (Equity): या श्रेणीमध्ये चित्रपटाच्या नफ्यात वाटा असणार नाही.

    Equity: There will be no equity or profit-sharing in this category.

  • मिळणारे लाभ (Rewards): या गुंतवणुकीच्या बदल्यात तुम्हाला आकर्षक भेटवस्तू (Merchandise), प्रीमिअर तिकीट्स, पडद्यावर नाव आणि इतर विशेष अनुभवांचा आनंद घेता येईल.

    Rewards: Exclusive merchandise, premium screening tickets, your name in the credits, and more.

२. अधिकृत गुंतवणूकदार

Serious Investors — Investor Category

गुंतवणूक

₹१,००,००० ते ₹१,००,००,००० पर्यंत

Investment: ₹1,00,000 to ₹1,00,00,000

हा गट अशा लोकांसाठी आहे जे चित्रपटाकडे एक व्यवसाय म्हणून पाहतात आणि मोठ्या स्तरावर सहभाग घेऊ इच्छितात.

This category is for individuals looking for a professional investment opportunity in cinema.

  • नफा भागीदारी (Equity): गुंतवलेल्या रकमेच्या प्रमाणात तुम्हाला चित्रपटाच्या होणाऱ्या नफ्यातून ठराविक टक्केवारी (Equity) मिळेल.

    Equity: You will receive a percentage of movie profits proportional to your investment.

  • नियम आणि अटी: हे गुंतवणूक कायदेशीर कराराद्वारे केली जाईल. नफ्याचे वाटप आणि अटी जाणून घेण्यासाठी नियम आणि अटी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

    T&C: All investments are subject to legal agreements. View Terms and Conditions.

मराठी सिनेसृष्टीत प्रथमच... मायबाप प्रेक्षकांचा, प्रेक्षकांकडून आणि प्रेक्षकांसाठीच घडणारा चित्रपट!

For the first time in Marathi cinema — a film of the people, by the people, for the people.

TARGET  ·  ₹10 CRORE INR

₹10.00 Cr

0.0%

100%

शर्यत सुरू
RACE BEGINS
05 MAY
FINISH LINE
15 JUNE

खालील स्तरांमध्ये चित्रपटाच्या निव्वळ नफ्यातील टक्केवारी समाविष्ट आहे · The following tiers include a % of the film's net profits

NO PAYMENT GATEWAY

फॉर्म भरल्यानंतर आम्ही तुम्हाला बँक हस्तांतरण तपशील ईमेलद्वारे पाठवू.

Bank transfer details will be sent to your email after you submit the interest form. We accept transfers from India, USA, Canada, Australia, UK, and more.